सावरगाव घुले ग्रामपंचायतवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास मंडळाचे सर्व 9 उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. विरोधी गटाला साधे खातेही उघडता आलेले नाही.

सावरगाव घुले ग्रामपंचायतचा कारभार हाकण्यासाठी तीन प्रभागांमध्ये 9 कारभारी निवडून आणण्यासाठी शेतकरी विकास मंडळाने सक्षम उमेदवार रिंगणात उतरवले होते. प्रभाग एकमध्ये नामदेव कोंडाजी घुले, सुजाता नवनाथ घुले, प्रणाली शिवाजी बोर्हाडे, प्रभाग दोनमध्ये अलका जिजाबा घुले, घमाजी भुतांबरे, राजू भाऊसाहेब खरात, प्रभाग तीनमध्ये सीमा बाबासाहेब कडू, राजेंद्र शत्रुघ्न घुले, लिलाबाई लहानू घुले हे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. गावातील मुलभूत प्रश्न आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली. सावरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. या निवडणुकीसाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष जालिंदर घुले, रेवजी घुले, शेतकी संघाचे संचालक अर्जुन घुले, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घुले, सोसायटीचे अध्यक्ष लहानू घुले, गोरक्षनाथ मदने, गणेश घुले, बाबासाहेब कडू, राजेंद्र घुले, सुहास घुले, लहू घुले, बाबासाहेब घुले, संतोष घुले, लक्ष्मण वाघ, मधुकर घुले, बाजी घुले, नारायण घुले, सावळेराव घुले, गेणू घुले, मच्छिंद्र घुले, भिका घुले, गोपीनाथ घुले, संजय घुले, राहुल घुले, अमोल फापाळे, नितीन घुले, उत्तम घुले आदी तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नवनिर्वाचित सदस्यांचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, डॉ.किरण लहामटे, इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

यशदाचे पंचायत राज व्यवस्थेचे मास्टर ट्रेनर नामदेव घुले हे प्रभाग एकमधून तिसर्यांदा विजयी झाले आहेत. हॅट्रीक केल्याने त्यांच्यावर पठारभागातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
