अकोले तालुक्याचा कोरोना आलेख पाचशेच्या उंबरठ्यावर…

अकोले तालुक्याचा कोरोना आलेख पाचशेच्या उंबरठ्यावर…
तर अगस्ति कारखान्याने शंभर रुग्णांसाठी उभारले कोविड केअर सेंटर
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यात 23 मे रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण लिंगदेव येथील मुंबईस्थित शिक्षक सापडल्यानंतर गेल्या तीन महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रशासनाने खानापूरसह चार प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी केंद्रे सुरु केली असून अगस्ति साखर कारखान्यानेही शंभर रुग्णांसाठी उभारलेले कोविड केअर सेंटर आजपासून (गुरुवार ता.27) कार्यान्वित होणार आहे.


अकोले तालुक्यातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने खानापूरसह राजूर, कोतूळ, देवठाण व ब्राह्मणवाडा या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी केंद्रे सुरु केली आहेत. तसेच खानापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये 94 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची सोय असून त्याजवळच अगस्ति साखर कारखान्याने विठ्ठल लॉन्सवर 100 रुग्णांसाठी खाटांची सोय केली आहे. या कोविड सेंटमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांना कारखान्याकडून चहा, नाष्टा, जेवण व अत्यावश्यक सुविधा तर शासनाकडून वैद्यकीय आरोग्य सुविधांसह औषधे पुरविली जाणार आहेत.


तालुक्यात मंगळवारी 42 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते तर बुधवारीही देखील यात वाढ होऊन 40 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. त्यात खानापूर येथे 103 व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये शेकईवाडी येथील 30 वर्षीय महिला, मनोहरपूर येथील 13 व 14 वर्षीय मुले, 17 व 21 वर्षीय युवती, 69 वर्षीय महिला असे पाच, नवलेवाडी येथील 49 वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील 22 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरूण, ढोकरी येथील 33, 40, 48 वर्षीय पुरूष व 35 वर्षीय महिला आणि खानापूर येथील 29 वर्षीय महिला व 53 वर्षीय पुरूष अशा 16 जणांचा समावेश आहे. कोतूळ येथे 39 व्यक्तींची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये पाडाळणे 67 वर्षीय पुरूष, अंभोळ 70 वर्षीय पुरूष, धामणगाव पाट 15 वर्षीय मुलगा व वाघापूर येथील 22 वर्षीय तरूण अशा चार जणांचा समावेश आहे. ब्राह्मणवाडा येथे 44 व्यक्तींची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये 25 वर्षीय, 50 वर्षीय, 90 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. देवठाण येथे 5 वर्षीय मुलगी, 25 वर्षीय, 40 वर्षीय महिला तर राजूर येथे 8 व्यक्तींची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये जामगाव येथील 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे.


अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार ढोकरी येथील 80 वर्षीय पुरूष, कोंभाळणे येथील 55 वर्षीय पुरूष, म्हाळादेवी येथील 50 वर्षीय पुरूष यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आहे. तर खासगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालातून कारखाना रोड येथील 59 वर्षीय पुरूष, महालक्षमी कॉलनी येथील 55 वर्षीय पुरूष, लहित येथील 67 वर्षीय पुरूष, कोतूळ येथील 72 वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथील 40 वर्षीय पुरूष, ढोकरी येथील 62 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील 52 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय व 47 वर्षीय महिला अशा अशा 9 जणांचा कोरोना अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 489 झाली आहे. यापैकी 316 जणांची यशस्वी उपचारांती घरवापसी झाली आहे. तर 163 रुग्णांवर उपचार चालू आहेत आणि 10 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

Visits: 72 Today: 1 Total: 1108359

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *