शेवगावचे पुरवठा निरीक्षक सेवेतून बडतर्फ

नायक वृत्तसेवा, शेवगाव
शासकीय सेवेत भरतीच्या वेळी माहिती दडवून ठेवल्याप्रकरणी शेवगाव येथील पुरवठा निरीक्षक पवनकुमार बिघोत यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे.

या प्रकरणी 10 डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते संकेत कळकुंभे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. बिघोत यांना 18 फेब्रुवारी, 2019 रोजी तात्पुरती पदस्थापना देण्यात आली होती. याबाबत जिल्हास्तरीय समितीकडून अहवाल मागवला होता. समितीच्या 22 डिसेंबर, 2020 च्या अहवालानुसार बिघोत यांच्यावरील गुन्हा न्यायप्रविष्ट असला, तरी शासनसेवेत दाखल होण्यापूर्वीचा आहे. तसेच हा गुन्हा लपविल्याने ते कारवाईस पात्र असल्याचे मत समिती सदस्यांनी मांडल्याचे आदेशात म्हंटले आहे.

Visits: 180 Today: 1 Total: 2166187

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *