चोरास मारहाण केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील पिंपळाचा मळा येथील म्हेत्रे वस्तीवरील शेतकर्‍याच्या गोठ्यातील शेळी चोरणार्‍यास बुधवारी (ता.6) मध्यरात्री स्थानिकांनी रंगेहाथ पकडले. त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. त्याच्यावर शेळी चोरल्याचा गुन्हाही दाखल झाला. परंतु, त्यानंतर घडले वेगळेच. चोरास मारहाण करतानाची चित्रफीत समाज माध्यमांवरून पसरल्याने पोलिसांनी अकरा ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नंदू परसराम ससाणे (वय 35, रा.मूलनमाथा) असे आरोपीचे नाव आहे. त्यास मारहाण केल्याप्रकरणी रामदास उद्धवराव म्हेत्रे, आसाराम गणपत बनसोडे, हर्षद सुनील तनपुरे, प्रशांत सुनील तनपुरे, बाबासाहेब भाऊसाहेब गोरे, गणेश बाबुराव रणशिंग, राहुल रामदास म्हेत्रे (सर्व रा.राहुरी) व इतर चौघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलीस शिपाई रवींद्र डावखर यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visits: 45 Today: 1 Total: 435736

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *