उद्योजक अमित पंडित यांना सात दिवसांची पोलीस कोठडी! अहिल्यानगर न्यायालयाचा निर्णय; नगर अर्बन बँकेची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बनावट सोने, खोटी कागदपत्रे, दस्तावेज आणि अस्तित्वातच नसलेल्या मालमत्ता तारण दाखवून कोट्यवधीची कर्जप्रकरणं मंजूर केली गेली. त्यामुळे कधीकाळी सामान्यांची बँक म्हणून घराघरात पोहोचलेली 110 वर्षांची नगर अर्बन बँक धाडकन कोसळली. संचालकांनी आपल्या आर्थिक हितासाठी कोट्यवधीच्या अनियमित कर्जप्रकरणांना मंजुर्या दिल्याने कधी सामान्यांना आधार देणारी ही बँक बुडाली. संचालक आणि कर्जदारांच्या संगनमतातून घडलेल्या 261 कोटी रुपयांच्या या महाघोटाळ्यात शनिवारी संगमनेरचे उद्योजक, अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांनाही अटक झाली होती. रात्री उशिराने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अहिल्यानगरला नेले. आज तेथील न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एकेकाळी सर्वसामान्यांची बँक असा लौकीक असलेल्या नगर अर्बन बँकेत खोटी कागदपत्रे, दस्तावेज, मालमत्ता आणि बनावट सोने तारण ठेवून 261 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला. त्यामुळे शतकाहून मोठी परंपरा असलेली ही बँक कोसळली. सर्वसामान्य ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने बँकेत ठेवलेल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी आंदोलने केली. या प्रकरणी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची सूत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे आली. सध्या पोलीस उपअधीक्षक डॉ.भारती यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सुरु असून बँकेची फसवणूक करुन घोटाळा करणार्या आरोपींचा कसून शोध सुरु आहे.

या महाघोटाळ्यात बँकेचे कर्जदार असलेले अनेक छोटे-मोठे व्यावसायिक व उद्योजक आहेत. त्यात संगमनेरात सर्वपरिचित असलेले अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन, उद्योजक अमित पंडित यांचाही समावेश आहे. त्यांनी तीन बनावट कंपन्या स्थापन करुन त्याच्यावर जवळपास 21 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. कालांतराने त्यांनी कागदोपत्री परस्पर या कंपन्यांची विक्रीही करुन टाकली या शिवाय अन्य प्रकरणातही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखा त्यांच्या मागावर होती, मात्र प्रत्येकवेळी त्यांनी हुल दिल्याने आजवर ते तपास पथकांच्या हाती लागत नव्हते. शनिवारी शहरातील एका मोठ्या व्यापार्याच्या कन्येचा विवाह सोहळा होता. या कार्यक्रमात पंडित उपस्थित राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समजली. त्यांनी संगमनेरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना साध्या वेशातील पोलिसांना पाठवून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक मथुरे यांनी कारवाई केली असता त्याची कुणकुण लागल्याने पंडित तेथून गायब झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक मथुरे यांनी स्वतः त्यांच्या घरावर छापा घातला.

यावेळी घर झडतीतही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. मात्र निरीक्षक मथुरे यांना ते घरातच असल्याचा दाट संशय असल्याने त्यांनी आपल्या पथकाला प्रत्येक खोलीची आणि घराच्या कानाकोपर्याची कसून तपासणी करण्यास सांगितले. त्यातूनच आपल्या शयनकक्षात नाट्यमयरित्या दडून बसलेले उद्योजक अमित पंडित पोलिसांच्या नजरेतून स्वतःचा बचाव करु शकले नाहीत. त्यांना ताब्यात घेत घरासह जवळच असलेल्या त्यांच्या पेट्रोल पंपावरही झाडाझडती घेवून कागदपत्र ताब्यात घेण्यात आली. रात्री उशिराने अहिल्यानगरहून आलेल्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना कायदेशीर अटक करुन आज तेथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Visits: 413 Today: 1 Total: 1579773
Post Views:
249