माहेश्वरी परिचय संमेलनाला उत्साहात प्रारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील राजस्थान युवक मंडळाच्यावतीने 8, 9 व 10 जानेवारी रोजी अखिल भारतीय विवाहयोग्य माहेश्वरी युवक-युवती परिचय संमेलनाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुक्रवारी (ता.8) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

संमेलनाचे हे 10 वे वर्ष असून मागील 9 वर्षे या संमेलनाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. आजवर झालेल्या 9 संमेलनातून देशभरातील अनेक युवक-युवतींचे विवाह जुळले यातून या संमेलनाचे यश समाजासमोर आले आहे. म्हणून यावर्षी संपन्न होणार्‍या या संमेलनाचा माहेश्वरी समाजबांधवांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहनही मालपाणी यांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, संगमनेर माहेश्वरी समाज आणि मालपाणी परिवार यांच्या सहयोगाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे पूर्व सभापती रामपाल सोनी यांच्या हस्ते तर महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.8) सकाळी 10 वाजता होणार झाले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या परिचय संमेलन समितीचे संयोजक श्रीकांत लखोटिया व अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अनीष मणियार उपस्थित होते. संमेलन झाल्यानंतर विवाहयोग्य युवक-युवतींच्या परिपूर्ण माहितीच्या दोन हजार परिपूर्ण रंगीत पुस्तिका प्रकाशित केल्या जाणार आहेत. तरी या संमेलनाचा लाभ माहेश्वरी समाजबांधवांनी अवश्य घ्यावा असे मंडळाचे कार्याध्यक्ष कैलास राठी, उपाध्यक्ष रोहित मणियार, खजिनदार कल्याण कासट, सचिव महेश झंवर, प्रकल्प प्रमुख सुमित अट्टल व उमेश कासट आदिंनी केले आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 114874

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *