सरकारी कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा येथील वनरक्षक बालिका भागवत फुंदे या ग्रामस्थांशी चर्चा करत असतानाच एकाने त्यांच्या हाताला झटका देत त्यांना लोटून दिले. ही घटना मंगळवारी (ता.5) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी एकावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी वनरक्षक बालिका फुंदे या गावातील जंगल फिरस्ती करून गावाजवळच्या फाट्यावर ग्रामस्थांबरोबर चर्चा करत होत्या. त्यावेळी शिवाजी मुक्ताजी खेमनर हा तेथे आला आणि त्याने वनरक्षक फुंदे यांच्या हाताला झटका दिला व पाठीमागे लोटून शिवीगाळ करत म्हणाला, ‘तु जंगलामध्ये कशी फिरस्ती करते’ अशी धमकी दिली. याप्रकरणी वनरक्षक बालिका फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी शिवाजी मुक्ताजी खेमनर याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 2/2021 भादंवि कलम 353, 332 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *