इंदुरीकर खटला; आता 13 जानेवारीला सुनावणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एका कीर्तनाच्या कार्यक्रमात गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केल्यामुळे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी या पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयात सुनावणी होत आहे. आज (बुधवार ता.6) होणार्या सुनावणीवेळी कामकाजापूर्वीच बचाव पक्षाचे अॅड.के.डी.धुमाळ यांनी पुढची तारीख देण्याची न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत 13 जानेवारीला सुनावणी ठेवली आहे.
दरम्यान, आज होणार्या सुनावणीवेळी लेखी स्वरुपात म्हणणे मांडण्यास न्यायालयाने निर्देशित केले होते. मात्र, कामकाजापूर्वीच निवृत्ती महाराज देशमुख यांचे वकील अॅड.के.डी.धुमाळ यांनी सुनावणीसाठी पुढची तारीख देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत 13 जानेवारीला पुढची सुनावणी ठेवली आहे. आता याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.