गेवराई येथे आरोपीकडून पोलिसांच्या गाडीला डंपरने धडक आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेलेले असताना घडला थरार

नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जीवे ठार मारण्याच्या (कलम ३०७) गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. या पोलिसांच्या गाडीला डंपरने धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस नाईक तुकारामखेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी (ता.२७) मध्यरात्रीनंतर पावणे दोन वाजेच्या सुमारास कल्याण खाटीक यांच्या वस्तीजवळ गेवराई (ता.नेवासा) येथे नेवासा पोलिसांत गुन्हा नोंद क्रमांक १२६७/२०२३ भादंवि कलम ३०७ नुसार दाखल गुन्ह्यातील आरोपी सागर रमेश कर्डिले (रा.गेवराई, ता.नेवासा) यास पकडण्यास गेलो होतो.

त्यावेळी तेथे त्याने आम्हांला पोलीस गणवेशात असलेले पाहून आमच्यावर दगडफेक केली. आम्ही स्कॉर्पिओ (क्र.एमएच.१२, जेसी.८४११) मध्ये बसून त्यास अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने डंपरने आमच्या वाहनाच्या डाव्या बाजूने जोराची धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न करुन वाहनाचे मोठे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
