चिखलठाण येथे मुळा नदीमध्ये बुडून मुलीचा मृत्यू

चिखलठाण येथे मुळा नदीमध्ये बुडून मुलीचा मृत्यू
नायक वृत्तसेवा, राहुरी
कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरुन मुळा नदीच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे मंगळवारी (ता.25) घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.


अश्विनी संपत पवार (वय 11, रा.चिखलठाण्प) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. कपडे धुण्यासाठी अश्विनी नदीवर गेली होती. ती लवकर घरी न आल्याचे आजोबा नामदेव पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी नदीवर जावून पाहणी केली असता ती पाण्यात पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर नदीच्या पाण्यामध्ये बुड्या मारून मृतदेह शोधून काढला. सांयकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी सरकारी रुग्णालायात पाठविण्यात आला. या दुर्देवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून मुळा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Visits: 151 Today: 1 Total: 1103629

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *