अंबिकानगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नायक वृत्तसेवा, अकोले
श्री काशी विश्वनाथ व श्री दत्त महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील अंबिकानगर (ढोकरी) येथे बुधवारी (ता.6) विविध धार्मिक या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये सकाळी नऊ वाजता होम हवन विधी, त्यानंतर साडेदहा ते साडेबारा अमोल महाराज भोत यांचे सुश्राव्य कीर्तन आणि दुपारी दीड ते संध्याकाळी सातपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवभक्त शिंगोटे महाराज, कवी ज्ञानेश्वर पुंडे, साहेबराव महाराज घुले, सयाजी महाराज पुंडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमांसाठी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, कैलास वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सभापती ऊर्मीला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, अकोले तालुका वारकरी संघटनेचे विश्वनाथ शेटे, दीपक महाराज देशमुख, पत्रकार डी.के.वैद्य, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, भाजप महिलाध्यक्षा शारदा गायकर, कावेरी घुमरे, प्रमिला ढगे व माधवी जगधने आदी उपस्थित राहणार आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्थ ढोकरी (अंबिकानगर) ग्रामस्थांनी केली आहे.