भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी बोराडे
भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी बोराडे
नायक वृत्तसेवा, शिर्डी
नुकत्याच झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये किरण बोराडे यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

सदर कार्यकारिणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी जाहीर केली आहे. किरण बोराडे यांच्या नियुक्तीबद्दल समाज माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रदेश पातळीवर दिलेली संधी हा मोठा कौतुकाचा विषय झाला आहे. पक्षाशी एकनिष्ठ व दिलेली जबाबदारी पार पाडणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. शिर्डी नगरपंचायत, विधानसभा, लोकसभा या निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. निवड होताच त्यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर योजना सहाय्यता केंद्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते सुरू केले. या निवडीबाबत बोलताना बोराडे म्हणाले, माझ्या सर्व सहकार्यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आपल्या विचारधारेशी सदैव एकनिष्ठ राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना, पक्षाची ध्येय धोरणे व नियोजित कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पार पाडणार आहे. या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानतो.

