राहाता पालिकेत कोरोनाचा शिरकाव; दहा कर्मचारी पॉझिटिव्ह
राहाता पालिकेत कोरोनाचा शिरकाव; दहा कर्मचारी पॉझिटिव्ह
नायक वृत्तसेवा, राहाता
राहाता नगरपालिकेत कोरोना विषाणूंनी प्रवेश करत दहा व इतर कर्मचार्यांचे कुटुंब अशा एकूण 19 जणांना बाधा केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पालिकेचे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने मंगळवारी (ता.25) पालिकेतील 35 कर्मचार्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये दहा कर्मचार्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे दोन दिवसांत शहरात एकूण 21 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग व इतर विभागाच्या कर्मचार्यांची रॅपिड टेस्ट घेण्याची प्रक्रिया सुरू होती. यामध्ये आणखी किती कर्मचारी कोरोनाबाधित होतील याची भीती आहे. बाधित झालेले काही कर्मचारी हे वसुली विभागात कार्यरत असल्याने ते कर्मचारी वसुलीसाठी अनेक नागरिकांच्या संपर्कात आले आहे हे तपासणीअंती स्पष्ट होईल. पालिकेचे कर्मचारी हे शहरातील विविध भागांमध्ये राहण्यास आहे. त्यांच्याकडून ते कोणाच्या संपर्कात आले हा एक मोठा प्रश्न आहे. पालिका कर्मचारी बाधित झाल्याने आता विविध भागांना ‘सील’ करणे प्रशासनाला कठीण होणार आहे. दरम्यान, हे कर्मचारी कोणाच्या संपर्कात आले याची यादी तयार करणे प्रशासनाला अवघड झाले आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवा वगळता पालिकेच्या सर्व विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.
राहाता पालिकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा.
– अजित निकत (मुख्याधिकारी, राहाता)