श्रीरामपूर परिवहन बस कार्यशाळेचा विस्तार करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
पुढील काळात येथील राज्य परिवहनच्या बस कार्यशाळेचा विस्तार करुन उत्तर विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी राज्य परिवहन महामंडळाचे नूतन व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे केली आहे.

प्रवासी संघटनेच्या मागण्या जाणून घेण्यासाठी संचालक चन्ने यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला प्रदेश प्रवासी महासंघाचे सहसचिव बाबासाहेब भालेराव, संजय सुपेकर, विजय गिते, दादासाहेब महाजन, सचिन भुजबळ, दिलीप जाधव उपस्थित होते. बैठकीत श्रीगोड यांनी एसटी बस प्रवाशांच्या आणि जनतेच्या अपेक्षांसह विविध सूचना मांडल्या. महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष स्व.गोविंदराव आदिक यांनी शहरातील एमआयडीसीमध्ये विभागीय एसटी बस कार्यशाळा सुरू करुन अहमदनगर जिल्ह्यातील पाच डेपो कार्यशाळेला जोडले. अपघातग्रस्त बसच्या दुरुस्तीसाठी यंत्र उभारणी केली. पुढील काळात टायर रिमोल्डींग कारखाना सुरू करुन स्वतंत्र विभागीय एसटी कार्यालय सुरू करुन प्रवासी सेवा वाढविण्याची मागणी श्रीगोड यांनी यावेळी केली. तसेच अधिकृत एसटी थांबा संदर्भातील तक्रारीकडे लक्ष द्यावे, बसेस नियमित वेळेवर सोडण्यात याव्यात, एसटी बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवावा, मुक्कामी बस याव्यात, कुरियर सेवा सुविधा वाढविण्यात याव्या, महिला प्रवासी सुरक्षा वाढवावी, बसस्थानक परिसर आकर्षक करुन अद्यावयत वेळापत्रक लावण्यात यावे अशा विविध मागण्या केल्या.

Visits: 3 Today: 1 Total: 29324

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *