ग्रामपंचायत निवडणूक कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवावी ः पिचड अकोले भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा

नायक वृत्तसेवा, अकोले
ग्रामपंचायत निवडणूक कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घ्यावे, असे आवाहन भाजपचे युवा नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी केले आहे. अकोलेतील भाजप कार्यालयात आयोजित तालुका कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे हे होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, वसंत मनकर, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, अकोले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे.डी.आंबरे, अमृतसागर दूध संघाचे संचालक विठ्ठल चासकर, अगस्ति साखर कारखान्याचे संचालक कचरू शेटे, अशोक देशमुख, राजेंद्र डावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब कासार, बाळासाहेब सावंत, पंचायत समिती सदस्य गोरख पथवे, माधवी जगधने, अलका अवसरकर आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत हा आता गावाच्या विकासाचे केंद्रबिंदू बनला असून, गाव विकासाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी चांगले कारभारी निवडून आले पाहिजे. यासाठी नेत्यांनी सुशिक्षित युवकांचा विचार करून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्राधान्य द्या. बाहेरील आयात उमेदवार करू नये असे स्पष्ट मत व्यक्त करुन विधानसभेत झालेले चुकीचे मतदान आता तालुक्यातील जनता भोगीत असून पक्ष संघटना मजबूत करावी असे नमूद केले. नवीन पदाधिकार्‍यांनी जबाबदारीने कार्य करीत पक्ष वाढविण्यासाठी काम करण्याचा सल्लाही शेवटी पिचड यांनी दिला.

भाजपचे तालुकाध्यक्ष भांगरे म्हणाले, पक्षातील पदे ही जबाबदारी असून भाजपमध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांना नक्की संधी मिळेल. संघटनात्मक काम वाढविण्यासाठी सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव यांना जिल्हा परिषछ गट, गणानुसार जबाबदारी देण्यात आली असल्याचे म्हणाले. याप्रसंगी वसंत मनकर, राजेंद्र देशमुख, शारदा गायकर, भरत घाणे, सुभाष वाकचौरे, गणेश पोखरकर, बाबासाहेब उगले, बाबासाहेब आभाळे, भाऊसाहेब गोडसे, राहुल देशमुख, अविनाश तळेकर, नाजिम शेख, विठ्ठल कानवडे, ज्ञानेश पुंडे, अमोल गोडसे, दत्तात्रय वाकचौरे, वैशाली सावंत आदिंनी निवडणूक व संघटनाविषयी मते व्यक्त केली. प्रास्ताविक सरचिटणीस यशवंत आभाळे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर आभार मच्छिंद्र मंडलिक यांनी मानले.

Visits: 18 Today: 1 Total: 115531

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *