कोपरगावमधील राजेंद्र खिलारींचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश आमदार आशुतोष काळेंची उपस्थिती; विविध प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी यांच्यासह दिगंबर जाधव, आजिनाथ खटकाळे, बबन भवर, रमेश खटकाळे, रामभाऊ खटकाळे, विजय भवर, अरुण कर्डक आदी कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.20) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोपरगाव शहरातील गौतम बँकेच्या सभागृहात हा प्रवेश झाला.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे नियोजनबद्ध प्रयत्न करतात. त्यातून प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. दीड वर्षात कोविडच्या साथीचा मुकाबला करीत असतानाही काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाचा वेग कायम ठेवला आहे. त्यांना विकासाची दृष्टी आहे, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

तर आमदार काळे म्हणाले, ‘खिलारी हे भाजपचे जुने व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. गोदावरी कालव्यांच्या पाणी प्रश्नावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी होईल. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल. अन्य पक्षाचे अभ्यासू कार्यकर्ते आपल्यासमवेत काम करू इच्छितात, हे पाहून आनंद वाटतो.’

Visits: 177 Today: 1 Total: 2122609

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *