चंपाषष्ठीनिमित्त नेवासा बुद्रुक येथे त्रिदिनात्मक सोहळ्याचे आयोजन उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने सोहळ्यास प्रारंभ

नायक वृत्तसेवा, नेवासा
लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबारायांची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे श्री म्हाळसा खंडोबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने त्रिदिनात्मक अखंड ज्ञानयज्ञ चंपाषष्ठी सोहळ्यास उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवारी (ता.18) प्रारंभ झाला.

यावेळी झालेल्या शुभारंभाच्या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते ग्रंथपूजन, वीणा पूजन, धर्म ध्वज पूजन करण्यात आले. म्हाळसा खंडोबा मंदिराचे मार्गदर्शक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे यांनी उपस्थित असलेल्या मोजक्याच भाविकांचे स्वागत करून संतपूजन केले.

यावेळी बोलताना मंडलिक महाराज म्हणाले, म्हाळसादेवीचे माहेर व खंडोबारायांची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक या पवित्र क्षेत्राचा महिमा अगाध आहे. या स्थानाची महती दूरवर पोहोचणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व संत महंतही मार्गदर्शन करतात. हा चंपाषष्ठीचा सोहळा शासकीय नियमांचे पालन करून सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन करून सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पारायण व्यासपीठ चालक कोंडीराम महाराज पेचे, ज्ञानेश्वर पेचे, प्रभाकर बोरकर, सेवेकरी सखाराम टेलर, कारभारी डोहळे, बाळासाहेब जपे, सर्जेराव चव्हाण, गोकुळ जायगुडे, संतोष गायकवाड, प्रसाद रहाट, अशोक मारकळी, नामदेव कुटे, एकनाथ रेडे, संतसेवक रंजना भाकरे, कमल कराळे, लता बोरकर, रावसाहेब पेचे, पुंजाराम पेचे यांच्यासह मोजकेच भाविक उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.डॉ.मुरलीधर कराळे यांनी आभार मानले.

कार्यक्रम रुपरेषा…
दि.18 ते 20 डिसेंबर या कालावधीत सकाळी 9 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, पहाटे 4.30 ते 6.30 काकडा आरती, सकाळी 7 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे अठराव्या अध्यायाचे पारायण, दुपारी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 7 वाजता आरती, रात्री 9 ते 11 भजन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे. सोमवारी दि.21 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र बहिरवाडी येथील युवा कीर्तनकार विजय महाराज पवार यांच्या सकाळी 9 ते 11 काल्याच्या कीर्तनाने या त्रिदिनात्मक सोहळ्याची सांगता होणार आहे. यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबांची पुण्यतिथी देखील साजरी करण्यात येणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

Visits: 121 Today: 1 Total: 1113165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *