घारगाव पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली पिकअपसह दरोड्याचे साहित्य केले जप्त; टोळीतील पाचपैकी दोघे अल्पवयीन


नायक वृत्तसेवा, घारगाव
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घारगाव पोलिसांनी डोळासणे येथे गुरुवारी (ता.17) मध्यरात्री जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी पिकअप, लोखंडी पहार, हेक्सपान, लोखंडी पक्कड, मिरची पूड आदी साहित्य जप्त केले आहे. तर टोळीतील पाच जणांपैकी दोघेजण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगून, नेमका या टोळीला दरोडा कुठे टाकायचा होतो हे मात्र अद्याप समजू शकले नाही. परंतु, पोलिसांची वेळीच त्यांचा बंदोबस्त केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.


याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, चालक बिरे हे परिसरात सरकारी पोलीस वाहनातून गस्त घालत होते. त्याचवेळी पोलीस निरीक्षक पाटील यांना गुप्त खबर्‍यामार्फत फोन आला की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथील पुलाखाली अंधारामध्ये एक पिकअप थांबली असून, अंधाराचा फायदा घेऊन पाच जण दबा धरून बसले आहे. माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी त्यातील तिघांना कसोशीने पकडले. त्याचवेळी दोघे जण पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग मोठ्या शिताफीने त्यांचाही बंदोबस्त केला.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता सतीश उर्फ चिक्या बाळू वाळे (वय 20), संतोष जालिंदर गुरुकुले (वय 20) व श्याम रामकृष्ण मोरे (वय 24) सर्वजण झोळे येथील असून, इतर दोघे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडे एक पिकअप, दोन लोखंडी पाईप, एक लोखंडी पहार, एक हेक्सपान, एक लोखंडी पक्कड मिळून आली आहे. तसेच प्लास्टिक पिशवीमध्ये मिरची पूड मिळून आली. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हे सर्वजण येथे मिळून आले. या प्रकरणी पोलीस हवालदार हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील तरुणांविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 439/2020 भादंवि कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत हे करत आहे.

Visits: 141 Today: 1 Total: 1110444

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *