अज्ञात वाहनाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारी रात्री अज्ञात वाहनाखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहरातील रहाणेमळा येथे घडली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी (ता.17) सकाळी ही घटना निदर्शनास आली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रहाणेमळा येथे अज्ञात प्रवासी वाहन बुधवारी रात्रीच्या सुमारास आले होते. त्यावेळी अंधारामध्ये अंदाज अथवा संतोष उर्फ दगडू श्रीरंग शेळके (वय 35) हा तरुण न दिसल्याने वाहनाखाली चिरडला गेला. रात्रभर तसेच पडून असताना गुरुवारी सकाळी वाहन घेऊन जातानाही चालकाच्या लक्षात आले नाही. तत्पूर्वी मयत तरुण बुधवारी सायंकाळी सहा वाजेपासून दारुच्या नशेत असल्याने घटनास्थळी पडून असल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, घटनास्थळी पोलिसांनी भेट देत पाहणी करुन पंचनामा केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालयात हलविला आहे. तर पुढील तपास सीसीटीव्हीच्या आधारावरुन सुरू केला आहे.