शिवसेनेच्या नेत्ररोग तपासणी शिबिरास रुग्णांचा भरघोस प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊन नये यासाठी कोपरगाव शहर शिवसेनच्यावतीने नुकतेच नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यास रुग्णांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
या शिबिरात अल्पदरात डोळ्यांची तपासणी मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी डोळ्यांची तपासणी करण्यासाठी जास्त पैसे खासगी दवाखान्यात मोजावे लागता आणि ती बाब लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचा प्रारंभ 9 डिसेंबरला होऊन सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहरातील लक्ष्मीमाता मंदिर, हनुमान मंदिर, शिवसेना चौक, सुभाषनगर, बेट अशा ठिकाणी आयोजन केले आहे. तीन दिवसीय शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर कालावधी वाढवून 13 दिवस करण्यात आल आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी व गरजू रुग्णांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, एसटी कामगार सेनेचे भरत मोरे, विधानसभा संघटक अस्लम शेख, अक्षदा आमले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख व नगरसेविका सपना मोरे, वर्षा शिंगाडे, महिला आघाडी शहरप्रमुख राखी वीसपुते, विशाल झावरे, उपशहरप्रमुख गगन हाडा, विकास शर्मा, विभागप्रमुख रफीक शेख, गौतम हाडा, राहुल देशपांडे, मुजमील शेख, इरफान शेख, स्वप्नील निरभवणे, भूषण पाटणकर आदी शिवसैनिकांनी केले आहे.