मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची पदोन्नतीवर बदली

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची पदोन्नतीवर बदली झाली असून ते आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त असतील. त्यांच्या जागी दयानंद गोरे यांची पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

मुख्याधिकारी कोकरे यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवार दि.२३ सप्टेंबर रोजी काढले आहेत. या आदेशात महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची उपायुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपलिका या पदावर प्रथमतः २ वर्षाच्या कालावधीकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे.

Visits: 95 Today: 3 Total: 1103034
