भोजदरी येथे विहिरीत दुचाकी आढळली

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील भोजदरी येथील एका शेतकर्‍याच्या विहिरीत दुचाकी आढळून आली आहे. सदर घटना मंगळवारी (ता.14) सकाळी उघडकीस आली आहे. तर या दुचाकीचे अनेक सुटे भागही खोलून नेले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, भोजदरी शिवारात एका शेतकर्‍याची विहीर आहे. त्या विहिरीवर परिसरातील महिला पाणी आण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी विहिरीतून पाणी काढत असताना त्यांना दुचाकी दिसली. त्यानंतर ही माहिती नागरिकांना समजताच पेमरेवाडीचे पोलीस पाटील विजय पोखरकर यांच्यासह अनेकजण विहिरीकडे आले. आदिनाथ पोखरकर, नीलेश पोखरकर, संजय डोंगरे, रोहिदास पोखरकर, नितीन डोंगरे, सागर डोंगरे, बाबू डोंगरे या सर्वांनी विहिरीतून दोरीच्या सहाय्याने दुचाकी बाहेर काढली. मात्र, दुचाकीचे अनेक सुटे भाग खोलून नेलेले होते. यावरुन ही दुचाकी नेमकी कोणाची आहे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Visits: 89 Today: 1 Total: 1110373

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *