आढळा जलाशयाचे आमदार लहामटेंच्या हस्ते जलपूजन

आढळा जलाशयाचे आमदार लहामटेंच्या हस्ते जलपूजन
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील 1 हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आढळा मध्यम पाटबंधारे प्रकल्पासह सांगवी व पाडोशी लघू पाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. यानिमित्ताने सोमवारी (ता.24) आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.


यावर्षी आढळा मध्यम पाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील 15 ते 16 गावांतील आठमाही बागायत फुलण्यास मदत होणार आहे. या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाटपाण्याचे योग्य नियोजन करू असा विश्वास आमदार लहामटे यांनी व्यक्त केला. यावेळी देवठाणच्या सरपंच रोहिणी सोनवणे, सीताबाई पथवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, दादापाटील वाकचौरे, युवक तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, अमित नाईकवाडी, जालिंदर बोडके, चंद्रमोहन निरगुडे, आर.के.उगले, पोपट दराडे, कोंडाजी ढोन्नर, सुनील दराडे, राजेंद्र कुमकर, प्रा.चंद्रभान नवले, विकास बंगाळ, संदीप शेणकर, संतोष नाईकवाडी, सहाय्यक कार्यकारी अभियंता गणेश हारदे, उपविभागीय अभियंता आर.एम.देशमुख, शाखा अभियंता आर.बी.बोरसे, आर.बी.कवडे, अभिषेक पवार, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Visits: 173 Today: 3 Total: 1103132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *