लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नायक वृत्तसेवा, नेवासा
अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथे घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरोधात सोनई पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सोनई पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रस्तापूर येथील आरोपी किशोर रमेश काकडे याने एका पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेत अत्याचार केला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास ‘तुझ्या आईवडीलांना जीवे मारेल’ अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी किशोर काकडे याच्याविरोधात गुरनं.250/2020 भादंवि कलम 363, 366, 376(2) (आय), 506 पोक्सो 4, 6 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. कर्पे हे करत आहे.

Visits: 176 Today: 1 Total: 2167069

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *