तक्रार आल्यास तात्काळ गुन्हे दाखल करा ः पाटील
![]()
नायक वृत्तसेवा, नगर
पोलीस ठाण्यात कोणी तक्रार देण्यास आल्यास तात्काळ गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करा, अशी सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांना दिल्या आहेत.

एरव्ही बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारीनंतर उशिराने गुन्हे दाखल होतात. त्यात अपघाताचे गुन्हे, साहित्याविरुद्धचा गुन्हा यांचा समावेश आहे. ही बाब पोलीस अधीक्षक पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे वाजवी कारणाशिवाय उशिरा गुन्हे दाखल होणार नाहीत, असा सक्त सूचना देण्यात आल्यानंतरही ऑक्टोबर 2020 अखेर जिल्ह्यात एकूण 245 गुन्हे उशिराने दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र, नोव्हेंबरअखेर ते 112 ने कमी झाले आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होण्याबाबत काही अडचणी असल्यास उपविभागीय अधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांना समक्ष भेटावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

