रस्तालुटीतील दोघांना पुनतगाव येथे अटक

नायक वृत्तसेवा, नेवासा
पाथर्डीहून माजलगावकडे जाणार्‍या दुचाकीस्वारांना लुटल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुनतगाव (ता.नेवासा) येथे छापा घालून दोघांना अटक केली आहे.

शुभम अनिल काळे (वय 21) व आनंद अनिल काळे (वय 25, रा.पुनतगाव, ता.नेवासा, मूळ रा.गणेशनगर, राहाता) अशी त्यांची नावे आहेत. सागर रमेश कर्डिले (रा.गेवराई, कुकाणा) हा पसार आहे. पाथर्डी येथून दुचाकीवर माजलगावकडे जाताना 29 सप्टेंबर रोजी वरील आरोपींनी दुचाकीस्वारांना दमदाटी करून 59 हजारांना लुटले होते. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने पुनतगाव येथे छापा घालून वरील दोघांना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी सागर कर्डिले याच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील दुचाकी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

Visits: 98 Today: 1 Total: 1100378

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *