दरोड्याच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
स्वस्तात सोन्याच्या आमिषाने लुटणार्‍या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पांड्या उर्फ पांडुरंग भोसले असे त्याचे नाव आहे. त्याला कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नाशिक येथील दिनेश दगडू पाटील यांना 10 लाख रुपयांत एक किलो सोने देण्याच्या आमिषाने आरोपी भगीरथ भोसले, हिरू भोसले (दोघे रा.पढेगाव) यांनी 7 जुलै, 2019 रोजी मावळगाव (कोपरगाव) शिवारात बोलावून घेतले. तेथे मारहाण करून त्यांच्याकडील 10 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीचे कलम वाढवले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासासाठी स्वतंत्र पथक नेमले होते. त्यातील आरोपी पांड्या भोसले पढेगाव येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे.

Visits: 111 Today: 2 Total: 1106471

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *