शिर्डीचे नगराध्यक्ष गोंदकरांनी स्वीकारला पदभार

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवाजी गोदंकर हे बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांनी सोमवारी (ता.7) नगरपंचायत कार्यालयात माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राजेश गोंदकर, माजी कैलास कोते, मंगेश त्रिभुवन, सर्व नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार विखे म्हणाले, आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणार्‍या शिर्डी शहराच्या नगराध्यक्षपदी शिवाजी गोंदकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. अनिता जगताप व जगन्नाथ गोंदकर यांनी आपला अर्ज ग्रामस्थांची विनंती व नगरसेवकांची विनंती मान्य करून माघारी घेतल्यानंतर ही निवड झाली आहे, त्यामुळे त्यांचेही अभिनंदन. यापुढे गोंदकर यांच्या माध्यमातून शिर्डीचा आणखी विकास होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली तर सत्काराला उत्तर देताना नूतन नगराध्यक्ष गोंदकर म्हणाले, मला नगराध्यक्ष केल्याबद्दल सर्वांचा आभारी असून, शिर्डी शहराचा विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

Visits: 156 Today: 2 Total: 1103705

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *