छात्रभारतीचे संगमनेर बसस्थानक समोर आंदोलन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयके रद्द करावे. या मागणीसाठी पंजाब व हरियाणा येथील शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला छात्रभारती संघटनेने पाठिंबा दर्शवत आज (बुधवार ता.2) संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन केले.

पंजाब व हरियाणामधील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. परंतु केंद्र सरकार लाठीचार आणि दडपशाही करुन खोटे गुन्हे नोंदवून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याचा निषेध करुन छात्रभारती विद्यार्थी संघटनेने जोरदार निषेध करुन आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या निशा शिवूरकर, अ‍ॅड.नईम इनामदार, हिरालाल पगडाल, छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, प्रशांत काकड यांनी आंदोलनात भूमिका मांडली. तर तालुकाध्यक्ष राधेश्याम थिटमे, तृप्ती जोर्वेकर, गणेश जोंधळे, सागर गुंजाळ, दीपाली केदारे, राहुल जर्‍हाड, हर्षल कोकणे, संदीप आखाडे, शीतल रोकडे आदी छात्रभारतीचे कार्यकर्ते सहभागी होते.

 

Visits: 14 Today: 1 Total: 118308

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *