रेखा जरेंची हत्या सुपारी देऊनच…

नायक वृत्तसेवा, नगर
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांमध्ये दोन कोल्हार येथील; तर एक केडगाव येथील आरोपी आहे. सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. त्यानुसार आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (30 नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेकर्‍यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकर्‍यांचा श्रीरामपूर व राहाता परिसरात शोध घेतला. अखेर राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना; तर कोल्हापूर येथून एकाला अटक केली. पोलीस या आरोपींकडे कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, गाडीला कट मारल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र जरे यांची हत्या ही सुपारी देऊनच केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Visits: 89 Today: 1 Total: 1115211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *