काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे.

या समितीमध्ये तेरा सदस्य असून, अध्यक्षपदी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. तर उपाध्यक्षपदी काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्षा तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत. समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड.गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार तुकाराम रेंगे, प्रकाश मुगदिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रवीण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश पातळीवरील या समितीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

Visits: 94 Today: 1 Total: 1104204

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *