बिबट्याच्या बचावापासून वन विभागाकडून जनजागृती मोहीम

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील प्रवरा व गोदावरी नदी परिसरासह तालुक्यातील अनेक भागांत बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. यामुळे नागरिकांत कमालीचे भीतीचे वातावरण पसरल्याने वन विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

मेंढ्या, कालवडी आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्याचे सर्वेक्षण करून ठिकठिकाणी पिंजरे लावावे. तसेच कायम स्वरुपासाठी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच निमगाव खैरी शिवारात पिंजर्‍यात अडलेला बिबट्या गोदावरी नदी परिसरातील नाऊर शिवारात सोडल्याने ग्रामस्थांनी संताप केला आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्यापासून बचावासाठी आता समाज माध्यमांद्वारे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गु्रपमधून व्हिडीओद्वारे शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती होत आहे.

 

Visits: 228 Today: 1 Total: 2167388

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *