पत्रकारिता अभ्यासक्रमात प्रा.डॉ.अनुश्री खैरे प्रथम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर वृत्तपत्र विद्या पदविका अभ्यासक्रमाच्या सन 2020 या शैक्षणिक वर्षात संगमनेर केंद्राचा 100 टक्के निकाल लागला असून, प्रा.डॉ.अनुश्री राजेंद्र खैरे यांनी 88.28 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर सुविधा संजय कबाडे-सालपे (88 टक्के) द्वितीय व जिजाबा सुखदेव हासे यांनी (87.42 टक्के) तृतीय क्रमांक मिळवला आहे. अरुण दत्तात्रय जाधव (86.71) यांनी चतुर्थ तर संतोष दत्तात्रय शेळके व गणेश दत्तात्रय जाधव यांनी 85. 86 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे.
प्रा.डॉ.संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर महाविद्यालयात हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, अभ्यासक्रम समन्वयक प्रा.सुशांत सातपुते यांनी अभिनंदन केले आहे. नोकरी करून पत्रकारिता शिकू इच्छिणार्यांच्या सोयीसाठी मागील आठ वर्षांपासून संगमनेर महाविद्यालयात प्रत्येक रविवारी अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. दरम्यान, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. इच्छुकांनी प्रा.सुशांत सातपुते (97667 60926) यांच्याशी संगमनेर महाविद्यालयाच्या कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.