शिर्डीमध्ये आत्मनिर्भर योजना सहाय्यता केंद्र सुरू

शिर्डीमध्ये आत्मनिर्भर योजना सहाय्यता केंद्र सुरू
नायक वृत्तसेवा, शिर्डी
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा शिर्डी शहराच्यावतीने प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर योजना सहाय्यता केंद्राचे नुकतेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते व भाजपयुमो महाराष्ट्र प्रदेश सदस्य किरण बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डीतील पालखी रस्त्यानजीक असणार्‍या पतसंस्थेसमोर करण्यात आले.


कोविड-19च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या रस्त्यावरील सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेच्या माध्यमातून पथविक्रेता, फेरीवाला, ठेलेवाला यांच्यासह सेवा उद्योग देणार्‍या व्यावसायिकांना 10 हजार रुपये विनातारण देण्यात येणार आहे. तसेच या कर्जास 7% अनुदान देखील आहे. या योजनेत भाज्या, फळे, खाद्यपदार्थ, चहा, चप्पल, पुस्तके, स्टेशनरी, केशकर्तन, पान दुकाने इत्यादींना लाभ घेता येईल. यावेळी गजानन शेर्वेकर, शहर उपाध्यक्ष सचिन शिंदे, अशोक पवार, राजेंद्र ह.गोंदकर, सोमनाथ भोसले, ओबीसी मोर्चाचे स्वानंद रासने, संजय सावंत, युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस योगेश गोंदकर, अमोल कोते, प्रसिद्धी प्रमुख प्रसाद शेलार, सचिव शंकर गोंदकर, अक्षय मुळे, पंकज भालेराव, लखन बेलदार, नरेश सुराणा, लक्ष्मण पेटारे आदी युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Visits: 148 Today: 1 Total: 2166229

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *