तामसवाडीच्या उपसरपंचपदी फोपसे

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यामध्ये अग्रेसर समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा फोपसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सदर ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 24 फेब्रुवारी, 2019 रोजी होऊन जनतेतून सरपंच म्हणून चंद्रकांत जगताप हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली 23 मार्च, 2019 रोजी पुष्पलता फोपसे या बिनविरोध उपसरपंचपदी निवडून आल्या. त्यादिवशी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष गावाच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली व मुळा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बाबासाहेब जगताप व त्यांचे सुपुत्र पिनू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासास कार्यकारी मंडळाने सुरुवात केली. गावाचा सर्वांगीण विकास करत असताना सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, सर्वांना मानसन्मान प्राप्त व्हावा या उद्देशाने सामंजस्याच्या भावनेतून उपसरपंच पद हे संचालक मंडळामध्ये फिरते असावे या उद्देशाने उपसरपंच पुष्पलता फोपसे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन या पदाची जागा मोठ्या मनाने रिक्त केली केली. त्यानंतर सदस्य मंडळ व कृतिशील मान्यवर यांच्यामध्ये चर्चा होऊन शोभा फोपसे यांना उपसरपंचपदी निवडून देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यानुसार नुकतीच अध्यासी अधिकारी तथा सरपंच चंद्रकांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडून शोभा फोपसे यांची निवड करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी गणेश डोंगरे यांनी निवडणूककामी विशेष सहकार्य केले. या निवडीबद्दल राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे आदिंनी अभिनंदन केले.

 

Visits: 104 Today: 1 Total: 1105785

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *