माजी आमदार मुरकुटेंनी मंत्री गडाख व तनपुरेंना दिले व्यायामाचे धडे

माजी आमदार मुरकुटेंनी मंत्री गडाख व तनपुरेंना दिले व्यायामाचे धडे
मुरकुटेंच्या निवासस्थानी भेट देऊन व्यायमशाळेची पाहणी करत घेतले मार्गदर्शन
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
व्यायामाशिवाय पर्याय नाही, कोरोनाच्या काळात व्यायाम लाभदायी आहे. आपणही नियमित व्यायाम करा, असा सल्ला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिला. गडाख व तनपुरे यांनी मुरकुटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या व्यायमशाळेची पाहणी केली. मुरकुटे रोज किती व्यायाम करतात, कसा करतात, त्यांच्या उत्तम तब्येतीचे रहस्य काय, असे प्रश्न विचारून त्यांनी मुरकुटे यांच्याकडून धडे घेतले.

वयाच्या 79 व्या वर्षी आजही आपण नियमित व्यायाम करतो. निवास्थानातील व्यायाम शाळेत जावून रोज पहाटे एक तास व्यायाम करतो. त्यानंतर क्रीडा मैदान परिसरात सायकल वरुन फेरफटका मारुन धावतो. त्यामुळे आजही आपले आरोग्य चांगले असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. शरीरासाठी आराम हा हराम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपण सातत्याने नियमित व्यायाम करायला पहिजेत. रोजचे काम वेळेवर करायला पाहिजे. आपण प्रत्येक रविवारी शेतात जावून शेतीची कामे करतो. शेतात काम केल्याने मनाला समाधान वाटते. आजचे अनेक शेतकरी शेतात जात नाही. शेतात काम करण्यास पुढाकार घेत नाही, असे मुरकुटे यांनी सांगितले.

मुरकुटे म्हणाले, राज्यातील अनेक मंत्री महोदयांना आपल्या घरातील व्यायाम शाळेचा पाहणी करुन व्यायामाचे महत्व पटवून दिले. निरोगी आरोग्यासाठी आपल्या वयानुसार रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटात सर्वांना व्यायाम आणि आरोग्याचे महत्व कळाले. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करायची असेल, तर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहेत. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आरोग्यासाठी लाभदायी असल्याचा सल्ला त्यांनी दिला.

माणसाने आयुष्याच्या शेवटपर्यंत काम केले पाहिजे. त्यामुळे अनेकदा विविध मंत्र्यांसह अनेकांना व्यायाम करण्यास प्रोत्साहीत करण्याचे कार्य करतो. माझा व्यायामाचा सल्ला ऐकायचा असेल तर ऐका, असे त्यांनी सांगितले. त्यावर मंत्री गडाख म्हणाले, साखर कारखाने सर्वांकडे आहेत. परंतु माजी आमदार मुरकुटे यांच्याकडे आपली व्यायामशाळा आहेत. वयाच्या 79 व्या वर्षीही त्यांनी आपले आरोग्य उत्तम ठेवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपणही नियमित व्यायाम करतो. आपल्याला माहित नाहीत. आपण वयाच्या 70 ते 80 वर्षापर्यंत मुरकुटे यांच्यासारखा आपण व्यायाम करु शकणार की नाही. परंतु व्यायाम करणे सर्वांना गरजेचे असून, मुरकुटे यांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याचे मंत्री गडाख यांनी स्पष्ट केले.

 

Visits: 178 Today: 1 Total: 1102643

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *