कोतूळमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
कोतूळमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
नायक वृत्तसेवा, कोतूळ
अकोले तालुक्याच्या मुळा खोर्यातील कोतूळ येथे सध्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
![]()
मुळा खोर्यातील धामणगाव पाट, अंभोळ, पैठण, पाडाळणे, लहित आदी गावांची कोतूळ ही मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांची नेहमी इकडे ये-जा असते. तर परिसरातील नागरिकांची देखील कामासाठी सतत रहदारी चालू असते. मात्र, मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक पायी आणि वाहनांवरुन प्रवास करण्यास देखील धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. या कुत्र्यांच्या दहशतीमुळे अबालवृद्धही घराबाहेर पडण्याचे धाडस करत नाहीये. दुचाकी अथवा सायकलवरुन प्रवास करणार्यांवर कुत्रे धाव घेतात, यातून अनेकदा अपघातही घडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ याची गंभीर दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करुन नागरिकांची भीतीतून मुक्तता करावी, अशी मागणी होत आहे.

