अध्यक्षपदी निवडीबद्दल भाऊसाहेब ढोकरेंचा सत्कार

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे खुर्द येथील प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब ढोकरे यांची अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नुकताच त्यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासह नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक परिषदेचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, आर.पी.रहाणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीनाक्षी तांबे, अशोक ढगे, विकास मंडळाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ देशमुख, सचिव मच्छिंद्र कोल्हे, गणेश वाघ, परिषदेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घुले, मंडळाचे अध्यक्ष संतोष भोर, भीमराज उगलमुगले, संतोष भोर, महिला अध्यक्षा अनिता नेहे-गुंजाळ, नगरपालिका महिला अध्यक्षा पुष्पा झिंजाड, मच्छिंद्र घुले, भाऊसाहेब भागवत, सरचिटणीस संजय आंबरे आदी शिक्षक उपस्थित होते.

Visits: 127 Today: 1 Total: 1107912

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *