गोडबोले गेटचा प्रस्ताव पूर्णत्वास जाईल : आ.डॉ.लहामटे

नायक वृत्तसेवा, अकोले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बाब म्हणून मंजुर करून निधी दिलेल्या पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे प्रकल्पाचा मुळा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. प्रकल्पातील जलसाठा वाढविण्यासाठी गोडबोले गेटचा प्रस्ताव असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे तो पूर्णत्वास जाईल असा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या ते ओसंडून वाहत आहे. उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिपळगाव खांड धरणाच्या पाण्याचे जलपुजन आ.डॉ. लहामटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अगस्ती कारखान्याचे संचालक परबत नाईकवाडी, अशोक देशमुख, मनोज देशमुख, ॲड.वसंत मनकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी,बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे,डॉ.मनोज मोरे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, हेमंत देशमुख,रवी आरोटे,युवक अध्यक्ष अक्षय अभाळे, हरिभाऊ फापाळे, मुकुंद लहामटे आदी उपस्थित होते. यावेळी विधिवत पूजा व साडी,चोळी अर्पण करत धरणातील पाण्याचे जलपुजन करण्यात आले.

यावेळी पुढे बोलतांना आ.लहामटे म्हणाले, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात ना.पवार याच्या विचाराला साथ देण्यासाठी असंख्य कार्यकर्ते पक्षात येत आहेत. पुढील काळात नव्या जुन्याचा मेळ घालत एकत्रीत काम करावे लागणार आहे.ना. पवार यांच्यामुळे तालुक्यात फार मोठी विकासाची कामे झालेली आहेत.

पिपळगाव खांड लघु प्रकल्प ना.पवार यांनी विशेष बाब म्हणून मंजूर करून निधी दिल्यामुळे पूर्णत्वास गेला.
गोडबोले गेट बसविल्यानंतर जलसाठा वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.यावेळी जलसपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुळा, आढळा व प्रवरा विभागातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 83 Today: 2 Total: 1105923
