श्रीरामपूर शहर पोलिसांचे दुचाकी मालकांना आवाहन
श्रीरामपूर शहर पोलिसांचे दुचाकी मालकांना आवाहन
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अनेक वर्षांपासून शहर पोलीस ठाण्यात पडलेल्या दुचाक्या संबंधित मालकांनी ओळख पटवून घेऊन जाव्यात. अन्यथा पुढील आठ दिवसांनंतर सदर दुचाकींचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

सदर दुचाकी अनेक वर्षांपासून उभ्या असल्याने त्यांचे क्रमांक अस्पष्ट झाल्याने तसेच वाहतूक कार्यालयाकडून वाहन मालकांची माहिती न मिळाल्याने दुचाक्या तशाच धूळखात पडून आहेत. त्यामुळे संबंधित मालकांनी आपल्या दुचाकीची ओळख पटवून आणि कागदपत्रे दाखवून घेऊन जाव्यात. अन्यथा पुढील आठ दिवसांनंतर सदर दुचाकी बेवारस म्हणून जाहीर लिलावाद्वारे विक्री केल्या जाणार असल्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. त्यामुळे याची नागरिकांनी नोंद घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केले आहे. सदर दुचाकींमध्ये एचएफ डिलक्स, तीन पल्सर, सुझुकी हयाते, दोन सीटी 100, दोन हिरा होंडा सी डॉन, एक सुझुकी मॅक्स, एक हिरो होंडा प्लस, एक प्लॅटिना आणि एक टीव्हीएस अपॅची अशा आहेत.

