धार्मिक स्थळांबाबत जिल्हाधिकार्यांकडून नियमावली जाहीर
धार्मिक स्थळांबाबत जिल्हाधिकार्यांकडून नियमावली जाहीर
नायक वृत्तसेवा, नगर
राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, मंदिरे 16 नोव्हेंबरपासून उघडली आहेत. मात्र मंदिरांमध्ये 65 वर्षांवरील व्यक्तींना तसेच 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दोन भक्तांमध्ये सहा फुटाचे अंतर राहील, असे दर्शन रांगेत नियोजन करण्याचा आदेशही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. मंदिरांबाबत जिल्हाधिकार्यांनी नियमावली जाहीर केली असून त्याचे पालन करण्यास सांगितले आहे.
राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे दिवाळी पाडव्यापासून जिल्ह्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे उघडण्यात आली आहे. सोमवारी सुट्टी असल्याने जिल्हा प्रशासनाने 17 नोव्हेंबर रोजी एका आदेशाद्वारे मंदीर व्यवस्थापनांना एक नियमावलीच तयार करून दिली आहे. मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे भाविकांना अनिवार्य करण्यात आले आहे. मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रसादाचे वाटप केले जाणार नसून भाविकांनाही फुल, हार, नारळ अशा वस्तू अर्पण करता येणार नाहीत. या आदेशामध्ये जाहीर करण्यात आलेली नियमावलीमध्ये तब्बल 18 नियमांचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे.