‘मारुती सुझुकी’कडून 1.5 दशलक्षांहून अधिक लोकांना प्रशिक्षण

नायक वृत्तसेवा, नगर
मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल (एमएसडीएस) या भारतातील आघाडीच्या संघटित ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलने 1.5 दशलक्षांहून अधिक अर्जदारांना यशस्वीरित्या सुरक्षित ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले आहे. भारतीय रस्ते अधिक सुरक्षित बनवावेत या मूळ उद्देशाने एमएसडीएसची स्थापना करण्यात आली आहे. दर्जेदार ड्रायव्हिंग ट्रेनिंगसाठी यात जागतिक मानांकनांचा समावेश करण्यात आला आहे. अत्याधुनिक ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स आणि अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या प्रॅक्टिकल आणि थिअरी अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या आधुनिक प्रशिक्षण पद्धतीच्या माध्यमातून एमएसडीएसने सातत्याने नवनवे मापदंड रचले आहेत.

या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे (विपणन आणि विक्री) कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूलची (एमएसडीएस) स्थापना नागरिकांना या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ड्रायव्हिंग ट्रेनिंग देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. भारतातील 238 शहरांमधील 492 हून अधिक केंद्रांसह ही भारतातील आघाडीची प्रोफेशनल ड्रायव्हिंग स्कूल चेन ठरली आहे. एमएसडीएसमध्ये शिकणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित ड्रायव्हिंगची कौशल्ये शिकवतानाच गाडीची प्राथमिक देखभाल आणि आपत्कालीन स्थितीत गाडी कशी हाताळावी याचे परिपूर्ण ज्ञानही दिले जाते. आत्तापर्यंत 1.5 दशलक्ष लोकांना सुरक्षित ड्रायव्हिंगमध्ये प्रशिक्षित केले आहे. यावरुन ड्रायव्हिंगचे वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान देण्याची आमची बांधिलकी या कामगिरीतून अधोरेखित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

एमएसडीएसमध्ये हायब्रिड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. यात तज्ज्ञांनी दिलेल्या ऑन-रोड ड्रायव्हिंग आणि क्लासरूम ट्रेनिंगचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना रस्त्यावरील आपले वर्तन, डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग, उत्तम नागरिक कायदा, ट्रॅफिकचे नियम आणि नियमन अशा अनेक गोष्टींबाबत हे तज्ज्ञ प्रशिक्षण देतात. एमएसडीएसतर्फे उपलब्ध अभ्यासक्रमात प्रत्येक अर्जदाराच्या गरजांनुसार वैयक्तिक वैशिष्ट्ये असतात.

Visits: 12 Today: 1 Total: 117448

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *