अकोले नगरपंचायतची प्रभागनिहाय सोडत जाहीर

अकोले नगरपंचायतची प्रभागनिहाय सोडत जाहीर
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले नगरपंचायतच्या प्रभागनिहाय सोडत मंगळवारी (ता.10) सकाळी 11 वाजे दरम्यान अकोले पंचायत समितीच्या सभागृहात प्रातांधिकारी डॉ.शशीकांत मंगरूळे, तहसीलदार मुकेश कांबळे व मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

अकोले नगरपंचायत निवडणुकीत एकूण सतरा (17) प्रभाग आहेत. प्रभागनिहाय प्रभाग 1 ओबीसी (महिला), प्रभाग 2 सर्व साधारण, प्रभाग 3 सर्व साधारण, प्रभाग 4 ओबीसी (पुरूष), प्रभाग 5 सर्व साधारण, प्रभाग 6 अनुसूचित जाती (महिला), प्रभाग 7 सर्व साधारण (महिला), प्रभाग 8 सर्व साधारण, प्रभाग 9 ओबीसी (महिला), प्रभाग 10 सर्व साधारण, प्रभाग 11 सर्व साधारण (महिला), प्रभाग 12 सर्व साधारण (महिला), प्रभाग 13 ओबीसी (महिला), प्रभाग 14 ओबीसी (पुरुष), प्रभाग 15 सर्व साधारण, प्रभाग 16 अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग 17 सर्व साधारण (महिला) अशी आरक्षणाची सोडत निघाली आहे. यावेळी संपत नाईकवाडी, प्रकाश नाईकवाडी, असीफ शेख, डॉ.रामहरी चौधरी, निखील जगताप, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक प्रमोद मंडलिक, रामनाथ शिंदे, योगेश नाईकवाडी, सुहास वाळुंज, अमित नाईकवाडी, गणेश कानवडे, परशराम शेळके आदी उपस्थित होते.

 

Visits: 188 Today: 2 Total: 2125082

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *