दूधगंगा पतसंस्थेकडून सभासदांना साखर वाटप सुरू ः कुटे
दूधगंगा पतसंस्थेकडून सभासदांना साखर वाटप सुरू ः कुटे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारातील अग्रगण्य असणार्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेकडून दीपावलीनिमित्त सभासदांना 31 मार्च, 2019 अखेरच्या भाग भांडवलावर प्रत्येकी शंभर रुपये भागास 400 ग्रॅम साखर याप्रमाणे एकूण 1390 पोते साखर वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांनी दिली.
पतसंस्था दरवर्षी सभासदांच्या मुलांना शालेय शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून पाच वह्या वाटप करते. संस्थेची आज अखेरची आर्थिक स्थिती भाग भांडवल 3 कोटी, 64 लाख, 91 हजार, ठेवी 134 कोटी 85 लाख, कर्जवाटप 93 कोटी 50 लाख, गुंतवणूक 53 कोटी 62 लाख, निधी 15 कोटी 6 लाख याप्रमाणे असून संस्था काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहे. साखर वाटप शुभारंभ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मण कुटे आणि संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अशोक सातपुते, तज्ज्ञ संचालक जयवंत गुंजाळ, संचालक रघुनाथ कुटे, राजेंद्र रहाणे, भास्कर पानसरे, नवनाथ अरगडे, रामनाथ कुर्हे, भास्कर शेरमाळे, भागवत गुंजाळ, सुनील गुंजाळ, देवेंद्र काळे, निवृत्ती सातपुते, नदीम शेख, मुक्ताबाई पवार, मंगल सातपुते, भाऊसाहेब खरात, कैलास घोडेकर, संजय गुंजाळ, माजी नगरसेवक गोरख कुटे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, कारखान्याचे संचालक दादासाहेब कुटे, बाजीराव कुटे, सोन्याबापू सातपुते, गोरख सातपुते, सुभाष कुटे, पोपट आगलावे, विलास गुंजाळ, भारत सातपुते, केशव जाधव, संपत अरगडे, मधुकर काळे, राजेंद्र कुटे, उत्तम पवार, संपत गुंजाळ, अण्णा गुंजाळ, रामदास रहाणे, संभाजी गुंजाळ, एकनाथ तोरकडी, तात्याराम कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, मुख्य लेखाधिकारी भाऊसाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.