स्व.कुंदनसिंग परदेशी यांचे कार्य प्रेरणादायी ः जाजू
स्व.कुंदनसिंग परदेशी यांचे कार्य प्रेरणादायी ः जाजू
नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी नगरसेवक स्व.कुंदनसिंग परदेशी यांचे कार्य प्रेरणादायी होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पक्षासाठी केलेल काम, त्यांची निष्ठा ही वाखाणण्यासारखी आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाते ज्येष्ठ नेते श्याम जाजू यांनी केले.
स्व.परदेशी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संगमनेर शहरातील ब्राम्हण बोर्डींगमध्ये आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारतीय जनता युवा मोर्चा व भाजप यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे, शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले, महिला मोर्चाच्या सोनाली नाईकवाडी, युवा मोर्चा उत्तर जिल्हाध्यक्ष अॅड.श्रीराज डेरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक सराफ, माजी नगरसेवक शिरीष मुळे, माजी नगरसेविका शोभा परदेशी, ज्योती भोर, अशोक पवार, प्राजक्ता बागुल आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जाजू म्हणाले, संगमनेर शहरात व इतर ठिकाणीही भाजप खूप मर्यादित पक्ष होता. अशा काळात स्व.परदेशी यांनी काम केले. त्यांच्या स्मृती जागवण्याचे काम रक्तदान शिबिरातून झाले. कार्यकर्ता हा एका रात्रीत घडत नाही. भाजप हा कार्यकर्ता घडविणारा पक्ष आहे. कार्यकर्ता घडविण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु असते. यामुळे आज भाजपला मोठा जनाधार मिळाला आहे. इतर पक्षातील कार्यकर्तेही भाजपला मानतात. भाजप सत्तेत आला नसता तर काश्मिरच्या 360 कलम हटविण्याचा प्रश्न, तिहेरी तलाकचा प्रश्न मार्गी लागला नसता असे ते सांगतात. पूर्वी भाजप प्रतिकूल परिस्थितून गेला आहे. प्रत्येक बुथवर एक मत पडले तरी जिकण्याचा आनंद व्हायचा. आता कार्यकर्त्यांच्याच बळावर चित्र पूर्ण बदलले आहे असे जाजू म्हणाले. याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली, त्यांनी स्व.परदेशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुदाम सानप, सुधाकर गुंजाळ, जावेद जहागिरदार, ज्ञानेश्वर कर्पे, राजेश चौधरी, काशिनाथ पावसे, वैभव लांडगे, राजेंद्र सांगळे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वरद बागुल यांनी केले तर आभार आयोजक योगराजसिंग परदेशी यांनी मानले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.