विद्या निकेतन फार्मसीचा उत्कृष्ट निकाल
विद्या निकेतन फार्मसीचा उत्कृष्ट निकाल
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा येथील विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट संचलित विद्या निकेतन औषध निर्माणशास्त्र (डी.फार्मसी) अभासक्रमाच्या महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाने द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर केला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.
या महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा 100 टक्के निकाल लागला असून, लामखडे शुभम सुरेश याने 97.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. गुंजाळ अपेक्षा साहेबराव हिने 97.10 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. दाभणे केतकी रमेश हिने 96.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी.एस.पाचपुते यांनी दिली. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष रामदास पोखरकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.