संगमनेरचा परिपूर्ण झालेला विकास देशासाठी मॉडेल ः प्रा. गायकवाड नगरपरिषदेच्या 200 कोटी निधींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नामदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे सक्षमतेने नेतृत्व करताना गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण होईल यासाठी अविरतपणे काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात भक्कम होत असून सततच्या विकासकामांतून संगमनेरचा परिपूर्ण झालेला विकास हा देशासाठी मॉडेल ठरला असल्याचे गौरवोद्गार राज्याच्या शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काढले. तर नामदार बाळासाहेब थोरात हे गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे भगीरथ असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने प्रभाग क्रमांक 1 ते 14 मध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ प्रसंगी नगरपरिषदेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे होते तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, डॉ. संजय मालपाणी, उपनगराध्यक्ष आरिफ देशमुख, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, शरयू देशमुख, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, अ‍ॅड. माधव कानवडे, लक्ष्मण कुटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कपिल पवार, शिवसेनेचे अमर कतारी, मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, प्रमिला अभंग, सभापती सुनंदा दिघे, मालती डोके, वृषाली भडांगे, मनीषा भळगट, सुहासिनी गुंजाळ, शबाना बेपारी, कुंदन लहामगे, सोनाली शिंदे, रुपाली औटी, सुमित्रा दिंडी, बाळासाहेब पवार, किशोर पवार, नूरमोहम्मद शेख, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, राजेंद्र वाकचौरे, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, डॉ. दानिश खान, हिरालाल पगडाल, वसीम शेख, कैलास वाकचौरे, नासिमबानो पठाण, रिजवान शेख, अशोक जाजू, योगेश जाजू, मुख्याधिकारी राहुल वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नामदार गायकवाड म्हणाल्या, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या समाजकारणाची परंपरा नामदार बाळासाहेब थोरात यांनी जपली असून गोरगरिबांच्या जीवनात सर्वांगीण आनंद निर्माण होण्यासाठी थोरात व तांबे कुटुबियांनी आपले जीवन खर्‍या अर्थाने समर्पित केले आहे. पक्षनिष्ठा, पक्ष नेतृत्वाबद्दद्दल प्रेम, जनतेचे प्रेम याची त्रिसूत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाने सदैव जपली आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यात नेतृत्व सांभाळताना संयम आणि गोड वाणीतून त्यांनी पक्षाला व पक्षातील कार्यकर्त्यांना मोठी बळकटी दिली आहे. विविध खात्यांमध्ये अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे नामदार थोरात यांच्यावर या तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम केले आणि राज्याला एक सुसंस्कृत नेतृत्व दिले आहे. संगमनेर शहर हे विकासाचे मॉडेल ठरले आहेत. स्मार्ट सिटी म्हणणार्‍यांनी खरेतर संगमनेर येऊन पाहावे असे सांगताना जातीय भेद निर्माण करून राजकारण करणार्‍यांना जनतेने ओळखले पाहिजे. आगामी काळात विकासाच्या पाठीमागे सर्वांनी भक्कमपणे उभे राहत नामदार थोरात यांचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले.

गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, संयम असणारे नामदार बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व सक्षम व दिशा देणारे आणि विकासाची दृष्टीकोन असलेले नेतृत्व आहे. संगमनेर तालुका हा सर्वात जास्त शेततळे असलेला राज्यातील तालुका ठरला आहे. शाश्वत विकासाचे समाजकारण करताना नामदार थोरात यांनी सर्वांना बरोबर घेतले आहे. राज्यात अनेक ऐतिहासिक व दूरदृष्टीचे कामे करताना त्यांनी कधीही कामाचा गवगवा केला नाही. मात्र शाश्वत कामे केली. एक सर्वात समजदार व समन्वयकाची भूमिका पार पाडणारे ते महत्त्वाचे मंत्री आहे. राज्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचे सर्वांचे आधारवड ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची अनेक मोठमोठी कामे झाली असून या विभागाचे ते भगीरथ असल्याचे म्हणाले.

नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेर नगरपालिकेने मागील पाच वर्षात अत्यंत चांगले काम केले आहे. यामध्ये सर्व नगरसेवक-नगरसेविका अधिकारी हे एकत्रित काम करत आहे. संगमनेरच्या चारही बाजूने जाणारी रस्ते चौपदरीकरण व सुशोभित होणार असून त्यामुळे पुढील अनेक पिढ्यांच्या भवितव्याचे काम होणार आहे. या सर्व कामी नागरिकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे. शहरात वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या असून पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न येथे सुटला आहे. भौतिक सुविधांबरोबर आंतरिक शांतता असलेल्या संगमनेर शहर असून बंधूभाव हा येथे नांदतो आहे. संस्कृत राजकारणाची परंपरा येथे कायम जपली असून पुढील पिढीने ती जपावी. आज राज्यात तीनच फोटो चालतात त्यामुळे संगमनेरकरांचा गौरव होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी नवनाथ अरगडे, गुलाब ढोले, निखील पापडेजा, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, राजेंद्र गुंजाळ आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत उपनगराध्यक्ष आरिफ देशमुख केले यांनी केले. प्रास्ताविक नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.

Visits: 111 Today: 3 Total: 1102476

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *