कोल्हार येथून कांद्याच्या शंभर गोण्यांची चोरी
कोल्हार येथून कांद्याच्या शंभर गोण्यांची चोरी
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील कोल्हार येथे तब्बल 95 हजारांचा कांदा चोरीला गेल्याचा प्रकार 1 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबरच्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी योगेश मिठ्ठलाल मुथ्था यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी (ता.2) उशिरा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश मुथ्था हे कांद्याचे व्यापारी असून त्यांचे कोल्हार परिसरात गोदाम आहे. या गोदामात ठेवण्यात आलेल्या कांद्याच्या शंभर गोण्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या असून, या कांद्याची अंदाजे किंमत 95 हजार रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी संजय राठोड हे करीत आहेत.

Visits: 86 Today: 1 Total: 1098705
