संगमनेर तालुक्याची पहिल्या क्रमांकाची प्रगती कायम राहील ः थोरात सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कारखान्याने कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रात बाहेरील सर्व शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप केले आहे. निर्विघ्नपणे 15 लाख 51 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप झाले असून संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आपण सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. निळवंडेच्या कालव्यांसह विकासकामे वेगाने सुरू आहे. मात्र निळवंडेला मदत न करणारे आता पाण्याबाबत काही गैरसमज निर्माण करत असून कुणाचेही पाणी न घेता न्यायहक्काचे पाणी संगमनेर तालुक्याला घेऊन पाण्याची बचत करून सुरू असलेली तालुक्याची पहिल्या क्रमांकाची प्रगती कायम राहील असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधव कानवडे, लक्ष्मण कुटे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. प्रेरणा शिंदे, रामहरी कातोरे, मधुकर नवले, हौशीराम सोनवणे, मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, अजय फटांगरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. यावेळी 37 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सपत्नीक आंबा वृक्ष, शाल, फेटा व अमृतमंथन अमृतगाथा देऊन सन्मान करण्यात आला.

संगमनेर तालुक्यातील जनतेच्या प्रेमामुळे व नेतृत्वाच्या विश्वासामुळे आज राज्यात मोठा सन्मान मिळत आहे. या पदाचा तालुक्याच्या विकासासाठी आणि निळवंडे कालव्याच्या कामासाठी आपण सातत्याने उपयोग केला आहे. कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू असून ऑक्टोबर 2022 मध्ये दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र या कामात कोणतेही योगदान देणारे आता पाण्याबाबत काही अफवा पसरवत आहे. आपण संगमनेर तालुक्याच्या न्यायहक्काचे पाणी घेणार असून या पाण्याचा काटकसर व ठिबक सिंचनाचा वापर करुन हा तालुका समृद्धीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि तो पुढेही राहील हाच आपला प्रयत्न आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच यापुढील काळात कारखाना कार्यक्षेत्रातील व बाहेरही ऊस उत्पादकांनी नोंद करणे अत्यंत गरजेचे आहे. यावर्षी सुमारे एक हजार हेक्टर उसाची नोंद नसल्याने नियोजनामध्ये काही अडचण झाली म्हणून शेतकर्‍यांनी नोंदणी केली पाहिजे. त्याचबरोबर हेक्टरी उत्पादन वाढविण्यावरही भर द्यावा असेही ते म्हणाले.

यावेळी दादापाटील वाकचौरे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, किशोर टोकसे, गजेंद्र अभंग, बाळासाहेब डांगरे, कारखान्याचे संचालक गणपत सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, अभिजीत ढोले, संपत गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिक यादव, भास्कर आरोटे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, मीरा वर्पे, मंदा वाघ, निखील पापडेजा, गौरव डोंगरे, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

Visits: 106 Today: 1 Total: 1113949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *