वधु-वर सुचक मेळावे काळाची गरज : प्राचार्य लिंगायत

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
वधु-वर सुचक मेळावा ही काळाची गरज बनली असून आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता लग्न जमविणे अतिशय जटील समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी अहिल्यानगर नाभिक महासंघाचे अध्यक्ष मनोज वाघ यांनी आयोजित केलेला ८ डिसेंबरचा वधु-वर सुचक मेळावा ही कौतुकास्पद बाब आहे. या मेळाव्याला सर्व समाज बांधवानी आपल्या मुला-मुलींची नोंदणी करून भरपूर प्रतिसाद दयावा असे आवाहन प्राचार्य सुभाष लिंगायत यांनी केले.

श्रीरामपूर येथील संतसेना मंदिरात शिर्डी वधु-वर सुचक मेळाव्याच्या फार्म व निमंत्रण पत्रिकेचे वितरण कार्यक्रमात प्रा.सुभाष लिंगायत बोलत होते. महाराष्ट्र नाभिक महासंघाचे कार्याध्यक्ष किरण बिडवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक व स्वागत श्रीरामपूर शहर नाभिक समाज संघटनेटचे अध्यक्ष गोपाळ लिंगायत यांनी केले. वधु-वर सुचक मेळाव्याचे प्रमुख मनोज वाघ यांनी दि. ८ डिसेंबरला होणाऱ्या मेळाव्याची माहिती दिली. २० नोव्हेंबर पर्यंत इच्छुक वधु-वरांची माहिती फॉर्ममध्ये भरून ३६० रू शुल्क भरुन आपली नोंदणी प्रत्येक तालुक्यात शहर व तालुक्यातील अध्यक्ष यांचेकडे करावी तसेच आपल्या माध्यमातून वधुवर सुचक पुस्तिकेसाठी जाहिरात देऊन सहकार्य करावे अशी मागणी केली. किरण बिडवे म्हणाले, आपल्या समाजातील इच्छुक वधुवरांसाठी मोठी संधी आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी ह्या मेळाव्यास सहभाग नोंदवून आर्थिक मदत देणगी रूपात देऊन या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार व्हा, असे आवाहन केले.

यावेळी नाभिक महामंडळ अध्यक्ष योगेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग वाघमारे, संजय जगताप, प्रवीण बोर्ड, अशोक कोरडे, दिलीप जाधव, बाळासाहेब वाघ, संजय जाईबहार, अण्णासाहेब सोनवणे, किशोर शिंदे, अमोल कोरडे, दिपक गायकवाड, गणेश वाघ, सूर्यकांत गवळी, वसंत लिंगायत, सुरेश सिसोदिया, चंद्रशेखर वाघ, यांच्यासहित श्रीरामपुर शहर, ग्रामीण भागातील समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. योगेश शिंदे यांनी आभार मानले.

Visits: 17 Today: 1 Total: 1104422
